महत्वाच्या बातम्या

 साटोडा गावाजवळ ट्रकची दुचाकीला जबर धडक : युवक गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : साटोडा गावातील वळण रस्त्यावर निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने २९ वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वृषभ राऊत (वय २९, रा. कारला) हा साटोडा येथून आपल्या कारला गावाकडे एमएच-३४ एई-८७७० क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. साटोडा गावाजवळील वळणावर असताना मागून येणाऱ्या एमएच-३१ डीएस-२३०० क्रमांकाच्या ट्रक चालकाने निष्काळजीपणे व हयगयीने वाहन चालवून दुचाकीला जबर धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला व गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ट्रक चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.





  Print






News - Wardha




Related Photos