महत्वाच्या बातम्या

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या प्रवेशाकरीता मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, ज्ञानज्योती  सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १० मार्च मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बीए, बीकॉम, बीएससी अशा १२ वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना १० मार्च पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज सादर केल्यावर गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी ११ मार्च  प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादीनुसार १२ ते २० मार्च पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालकांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos