महत्वाच्या बातम्या

 ज्येष्ठ नागरिक कक्षाचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : बदलत्या सामाजिक परिस्थितीत नागरिकांच्या समस्या वाढत आहेत. वृध्दापकाळात त्यांना आधाराची, त्यांना समजून घेण्याची गरज असते. मात्र, अनेक घरांमध्ये वृध्दांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, ते दुर्लक्षित ठरतात किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. घरातील वातावरण गढुळ होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपले उर्वरित आयुष्य घालविणे कठीण होऊन बसते. अशा वेळी आपल्या व्यथा मांडून समस्यांचे निराकरण करणारे हक्काचे एखादे व्यासपीठ असावे, असे ज्येष्ठ नागरिकांना वाटत असते. 

याकरीता ज्येष्ठ नागरिकांना वृध्दापकाळ चांगल्या त-हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी शासन निर्णयान्वये वृध्दांसाठी असणा-या सर्व योजना एकाच छत्राखाली आणून त्या योजनांचा लाभ संबंधीत वृध्दांना देण्यासाठी नागपुरातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या पाठपुराव्यातून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर येथे सन २०२२ पासून ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

समस्याग्रस्त व पिडीत जेष्ठ नागरिकांनी स्वतः जेष्ठ नागरीक कक्षात येवून लिखित स्वरूपात त्यांची समस्या सांगावी किंवा कार्यालयाच्या दूरध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधावा, जेष्ठ नागरिक कक्षातर्फे आपली समस्या सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येईल. तसेच सर्व जेष्ठ नागरीक मंडळातील सदस्यांना त्यांच्या विभागातील समस्याग्रस्त जेष्ठ नागरीकांना याबदल माहिती दयावी व त्यांना समाज कल्याण विभागातील कक्षात पाठविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन  सहाय्यक आयुक्त, समाज, कल्याण सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिक कक्षातील संयोजक, सहसंयोजक, उपसंयोजक, सदस्य व निमंत्रित सदस्यांची निवड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिक कक्ष सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर शासकिय आय टी आय च्या समोर नागपूर येथे समस्याग्रस्थ जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी व त्यांना समाधान देण्यासाठी जेष्ठ नागरिक कक्षात रोज सकाळी १२ ते २ या वेळेत ज्येष्ठ नागरिकांचे तीन प्रतिनिधी उपस्थित राहतात व कक्षात आलेल्या ज्येष्ठांच्या व्यथा, समस्या, अडचणी घेऊन येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या प्रतिनीधीकडून मार्गदर्शन केले जाते व त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. गरज पडल्यास त्यांचे कौन्सिलिंग केले जाते. कक्षाचे सदस्य उपस्थित राहून जेष्ठ नागरीकास निशुल्क सेवा प्रदान करतील.





  Print






News - Nagpur




Related Photos