नागपूरमध्ये दूषित पाणीपुरवठा : महापौरांनी सात दिवसांत उपाययोजना करण्याचे दिले आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : शहरातील नऊ झोनमधील सुमारे ५० वस्त्यांमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे ४ लाख नागरिकांना आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येची दखल घेत महापौर नीता ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सात दिवसांत या समस्येवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
स्थायी समिती सभागृहात बुधवारी आयोजित जलप्रदाय विभागाच्या आढावा बैठकीत महापौरांनी महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) यांचे काम तपासले. बैठक दरम्यान दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारींचा मोठ्या प्रमाणावर उल्लेख करण्यात आला.
महापौरांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठ्याला पुरेशा दाबात आणण्यासोबतच, काही भागांतील पाणी बिलांमध्ये झालेल्या वाढीची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तसेच, पाइपलाइन खोदकामाच्या दुरुस्तीचा मागोवा घेण्याचे निर्देशही दिले.
कुठे आहेत समस्यांचे केंद्र? -
लक्ष्मीनगर झोन: अजनी येथील ईस्ट समर्थ नगर
धरमपेठ झोन: दाभा बस्ती, पांढराबोडी, पंचशील नगर
धंतोली: वंजारी नगर (जुना ईएसआर), वसंत नगर
नेहरूनगर: नंदनवन लेआउट, कवेलू क्वॉर्टर, गुरुदेव नगर, ताजबाग, दरगाह परिसर
गांधीबाग: सिरसपेठ, गुलाब बाबा मठ, जलालपुरा, मिर्झा गली, गणेशपेठ, राजाबक्षा, लोधीपुरा
सतरंजीपुरा: इतवारी रेल्वे स्टेशन परिसर, प्रेम नगर, ठक्कर ग्राम, देवघरापुरा, पीली मरबत चौक, विनोबा भावे नगर
लकडगंज: गिरिजा नगर, गजानन मंदिर परिसर, भांडेवाडी झोपडपट्टी, पारडी, सुभान नगर
आसीनगर: पवन नगर, योगी अरविंद नगर, आनंद बुद्ध विहार, हडको कॉलनी, नारा गाव
मंगळवारी: हसनूर आयटीआय, बोरगाव, मंजापूर येथील निखरे लेआउट
याशिवाय, हनुमाननगर झोनमध्ये सध्या दूषित पाणीपुरवठ्याची कोणतीही तक्रार नसल्याचे महापौरांनी सांगितले.
पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा आणि डिजिटल सुविधांची माहिती महानगरपालिकेकडे एकूण १०३ पाण्याच्या टाक्या असून, त्यात स्मार्ट सिटीच्या ४ टाक्यांचा समावेश आहे. या टाक्यांद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. ओसीडब्ल्यू आणि जलप्रदाय विभागाने पाणी बिल भरण्यासाठी क्यूआर कोड स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे ऑनलाइन बिल भरण्याचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचे ओसीडब्ल्यूचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापौरांची तातडीची कारवाई -
महापौर नीता ठाकरे यांनी संबंधित विभागांना दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. ही समस्या लवकरात लवकर सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका आणि ओसीडब्ल्यू यांना एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश दिले.
News - Nagpur




Petrol Price




