नामवंत संस्थेद्वारे प्रशिक्षण करीता एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अहेरी येथे अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी नंतर नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सह्याने अभियांत्रिकी व वैद्यकिय प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येत आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय / अनुदानित आश्रम शाळा / एकलव्य रेसिडेशियल स्कूल अंतर्गत इ.११ वी व १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता अभियांत्रिकी व वैद्यकिय प्रवेश परिक्षेची तयारी करुन घेणेकरीता प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आय.आय.टी.मधील अभ्यासक्रमांना जास्तीत जास्त मुलांना प्रवेश घेणे सोयीस्कर होईल. करीता सदर योजनेचे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ घेता यावा याकरीता दोन वर्षे नामवंत संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
चाचणी परिक्षेकरीता सर्व शासकीय, अनुदानित व एकलव्य रेसिडेंशियल तसेच शासकीय /खाजगी तथा मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी जे मार्च २०२६ च्या १० वी च्या परिक्षेस बसलेले आहेत व त्यापैकी जे विद्यार्थी NEET व CET/JEE करीता इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र विशिष्ट नमुन्यात भरुन एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथील कार्यालयात १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जमा करावे.
सदर योजनेअंतर्गत JEE/NEET प्रशिक्षणाकरिता चाचणी घेवुन गुणानुक्रमे निवड करण्यात येणार आहे. असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी, कुशल जैन यांनी कळविले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




