अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अमरावती : शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव पेठ ते पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील गोराळा ते सावरखेड दरम्यान वनविभागाच्या रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
सरफराज खान (रा. हबीबनगर, अमरावती) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरफराज खान हे दुचाकीने शिरखेड येथे पत्नीच्या माहेरी जात होते. दरम्यान, गोराळा ते सावरखेड दरम्यानच्या मार्गावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सरफराज खान यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. ६ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून पुढील कारवाई केली.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
News - World




Petrol Price




