महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा भरते बकरीच्या गोठ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : देशाची भावी पिढी शाळेत घडते. मात्र, गोंदियातील डिजिटल शाळेतील चिमुकले चक्क बकरीच्या गोठ्यात बसून विद्यार्जनाचे धडे गिरवत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील कन्हारटोला गावातील आहे. गावातील जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारतीची मागणी पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने बकरीच्या गोठ्यात बसून शिक्षण पूर्ण करावे लागत आहे. महाराष्ट्र राज्याने आपल्या नीतिनिर्धारणात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. निदान असे सांगितले तरी जाते, मात्र शिक्षणाच्या दयनीय अवस्थेचे चित्र गोंदिया जिल्ह्यातील कन्हारटोला या गावात पाहायला मिळते.

गोरेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कन्हारटोला गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत २० वर्षातच जीर्णवस्थेत आले. शाळेतील स्लॅबचा भाग खाली कोसळू लागला. इतकेच नव्हे तर, ठेकेदाराने या शाळेचे बांधकाम इतके निकृष्ट केले की, स्लॅबचा लेन्टर देखील हळूहळू वाकू लागला आहे. शाळेतील हरिणखेडे गुरुजींनी याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शाळा व्यवस्थापन समितीला देखील दिले. मात्र, वर्ष लोटूनही शाळेला नवीन वर्ग खोली मिळाली नाही. पाठपुरावा करुनही प्रत्यक्ष बांधकाम आणि निधीबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून चालढकल होत आहे. हरिणखेडे गुरुजींनी शाळेशेजारी असलेल्या तेजराम रहांगडाले यांच्या घरी शाळा भरविण्याचा निर्णय घेतला. रहांगडाले यांच्याकडे असलेल्या बकऱ्या ते घराच्या ओसरीत (पडवीत) बांधत होते. ती जागा त्यांनी निःशुल्क दिली आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटला. मागील वर्षी शाळेची पटसंख्या १९ होती. आता ती घटली असून नऊवर गेली आहे. आता या बकरीच्या गोठ्यात भरणाऱ्या डिजिटल शाळेत पहिली ते तिसरीच्या केवळ सहा मुली आणि दोन मुले शिक्षक घेत आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos