पोलीस शिपाई भरती बाबतचा ४ जानेवारी २०२१ चा शासन निर्णय रद्द : गृहमंत्री अनिल देशमुख


- एसईबीसी (SEBC) उमेदवारांना दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई  :
राज्यात पोलीस भरती २०१९ करीता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाकडून ४ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
पोलीस शिपाई भरती २०१९ करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सा.प्र.वि. कडील  २३ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-01-07


Related Photos