महत्वाच्या बातम्या

 गळफास घेऊन ५८ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील गौरीनगर परिसरातील मैदानाच्या कोपऱ्यात असलेल्या करंजीच्या झाडाला गळफास घेऊन दिलीप सोहनलाल चौधरी (वय ५८) यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (१४) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिलीप चौधरी हे गौरीनगर परिसरात वास्तव्यास होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी मैदानातील करंजीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. मात्र, दिलीप चौधरी यांनी आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

या प्रकरणी रमन दिलीप चौधरी (वय २७) यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार शेख करीत असून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या घटनेने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





  Print






News - Gondia




Related Photos