शेतातील झाडाला गळफास लावून तरुणाची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बिलारगोंदी येथे तरुणाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी २५ घडली. नितेश श्रीराम फुरसुंगे (वय २७, रा. बिलारगोंदी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या दरम्यान नितेश घरात कुणालाही काहीही न सांगता सायकलने बाहेर पडला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तसेच गावातील मित्र व नातेवाइकांकडे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वत्र शोध घेऊनही नितेशचा काहीही पत्ता लागला नाही.
दरम्यान, शुक्रवारी २६ सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास सोमाजी जगदाड यांनी फिर्यादी खुशाल कुरसुंगे (वय ३०) यांना दूरध्वनी करून शेतातील पळसाच्या झाडाला नितेश गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
News - Gondia




Petrol Price




