उभ्या कंटेनरवर दुचाकी आदळून इसमाचा मृत्यू, आमगाव शिवारातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
उभ्या कंटेनरवर दुचाकी आदळून इसमाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज १६ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडला.  सुधाकर जगन्नाथ खोडे (४२) रा. सेलडोह असे मृताचे नाव आहे. 
सुधाकर खोडे यांच्या मालकीच्या दोन गाड्या दिलीप बिल्डकॉन कंपनीमध्ये आहेत. त्यातील एक गाडी ते स्वत: चालवायचे. त्याकरिता सुधाकर खोडे पहाटेच एमएच ३१ बीक्यू ९८६५ क्रमांकाच्या दुचाकीने कर्तव्यावर जात होते. दरम्यान, आमगाव शिवारातील सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या एमएच ४० एन ६९४३ क्रमांकाच्या नादुरूस्त कंटेनरवर दुचाकी आदळली. त्यात सुधाकर खोडे यांचा जागीच मृत्यू झाला. खोडे यांच्या अपघाताची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. सिंदी पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा करीत नोंद केली. दरम्यान, कंटेनरला रेडीअम लावले नसल्याची माहिती पुढे येत आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2018-10-16


Related Photos