राज्य सरकारने सोयाबीन खरेदी मर्यादेत तुटपुंजी वाढ केली, कोल्हापूर अव्वल


- संपूर्ण राज्यभर एकच हेक्टरी ३० क्विंटल मर्यादा आवश्यक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : राज्य सरकारने सोयाबीन एमएसपी दराने खरेदीच्या मर्यादेत तुटपुंजी वाढ केली आहे. मात्र, राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये बहुतांश जिल्ह्यांची खरेदी मर्यादा कमी करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा मात्र वाढीव मर्यादेसह अव्वल स्थानी आहे. तथापि, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने संपूर्ण राज्यभर एकाच हेक्टरी ३० क्विंटल (एकरी १२ क्विंटल) मर्यादा लागू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे शेतकरी संघटनांचे मत आहे.
राज्यातील लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पेरणीक्षेत्र चार लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर बुलढाणा, बीडचे पेरणीक्षेत्र तीन लाख हेक्टरच्या वर असून, वर्धा, जालना, नागपूर व अन्य जिल्ह्यांतील पेरणीक्षेत्र एक लाख हेक्टरच्या आसपास आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केली आहेत.
तथापि, सोयाबीन खरेदी प्रक्रियेत विविध अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे. विक्री नोंदणी, खरेदीला विलंब आणि उत्पादनक्षमतेनुसार मर्यादा यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन एमएसपी दराने विक्री करण्याची इच्छा कमी होत आहे. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मिलिंद दामले यांनी यावर शंका व्यक्त करत म्हटले आहे की, सरकार शेतकऱ्यांच्या खरेदी प्रक्रियेत अडथळे निर्माण करीत आहे.
सोयाबीन खरेदी मर्यादा (क्विंटल/प्रतिएकर)
जुनी मर्यादा - वाढीव मर्यादा -
नाशिक : ६.०० - ११.०६
पुणे : ९.४० - १४.६०
कोल्हापूर : ९.८० - १७.३१
लातूर : ८.०४ - ११.०१
धाराशिव : ६.८० - ९.३०
नागपूर : ३.०० - ५.६१
शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनावर आधारित खरीदी करण्याची अधिकृत संधी मिळावी यासाठी सरकारने तातडीने एकसमान खरेदी मर्यादा लागू करणे आवश्यक आहे.
News - Nagpur




Petrol Price




