महत्वाच्या बातम्या

 राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील याचिकेवर महत्त्वाचा आदेश : कोल्हापूर सर्किट बेंचाचे निर्णय मुंबई उच्च न्यायालयात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / कोल्हापूर : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील निर्णय घेणाऱ्या याचिकेवर कोल्हापूर सर्किट बेंचने महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या बेंचसमोर गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्ते सुनील मोदी यांच्या वतीने ऍड. संग्राम भोसले यांनी राज्यघटनेच्या कलम १७३(जी) अन्वये १४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यपालांनी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

न्यायमूर्ती कर्णिक यांनी याचिका फक्त कोल्हापूर बेंचपुरती मर्यादित न राहता, राज्यभर महत्त्वाचा असलेला हा मुद्दा असल्याचे सांगितले. परिणामी, या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रिन्सिपल बेंचसमोर केली जावी, असे आदेश न्यायमूर्ती कर्णिक यांनी दिले. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाकडे दोन आठवड्यांत प्रकरण वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे, या याचिकेवर मुख्य न्यायाधीश यांच्या बेंचसमोर पुढील सुनावणी होईल.

घटनाक्रम -

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. परंतु, राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ नावे राज्यपालांकडे पाठवली, ज्यावर राज्यपालांनी मंजुरी दिली. याच्या विरोधात सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली. कोल्हापूरचे नागरिक असल्याने, त्यांनी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल करण्याची विनंती केली होती, जी बेंचने स्वीकारली. या प्रकरणाचा पुढील निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रिन्सिपल बेंचसमोर येईल.





  Print






News - Rajy




Related Photos