कुर्ली येथील यश उर्फ विकास नगराळे आत्महत्या प्रकरणी पारवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल


- वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच तपासाची पुढील दिशा ठरविण्यात येईल - पारवा पोलीस
विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील यश उर्फ विकास दत्ता नगराळे (वय १७, रा. कुर्ली ता. घाटंजी) याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी आई सतिका दत्ता नगराळे (वय ३७, रा. कुर्ली ता. घाटंजी) यांच्या जबानी रिपोर्ट वरुन पारवा पोलीस ठाण्यात अपराध क्रंमाक ५६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १९४ आकस्मिक मृत्यूचा गुन्हा महीला पोलीस काॅ. मंगला तलांडे यांनी नोंदविला आहे. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गोपाल राठोड पुढील तपास करीत आहे.
पारवा पोलीस स्टेशनला दिलेल्या जबानी रिपोर्ट नुसार, मी सतिका दत्ता नगराळे समक्ष पोलीस स्टेशनला येवुन जबानी रिपोर्ट देते की, मी कुर्ली येथे वरील नमुद पत्त्यावर यश उर्फ विकास दत्ता नगराळे (वय १७) व आकाश दत्ता नगराळे (वय १०) असे दोन्ही मुलांसोबत कुर्ली येथे राहते. माझे पती दत्ता नगराळे हे वझरा (ता. किनवट जि. नांदेड) येथे राहतात व शेतीचे काम करतात. मी कुर्ली येथील ऋषिकेश तम्मेवार यांचे ६ एकर शेत १ लाख रुपये मक्त्याने केले आहे. मी व माझा मुलगा यश उर्फ विकास नगराळे असे दोघेही त्या शेतात कपाशीचे / प-हाटीचे पिक पेरल्याने ऋषिकेश तम्मेवार यांच्या शेतात नेहमी जाणे येणे करत असतो.
आमचे कुर्ली येथील मोहल्यात नसरीन पठाण शब्बीर पठाण (वय ३५, रा. कुर्ली ता. घाटंजी) हे राहत असुन मागील ४ ते ५ महिण्यापासुन ती तिचे पती सोबत वेगळी राहत आहे. माझा मुलगा यश उर्फ विकास नगराळे हा मागील २ ते ३ महिण्यापासुन नसरीन पठाण हिचे सोबत बोलत होता, असे मला माहिती पडले. त्यावेळी मी माझा मुलगा यश उर्फ विकास नगराळे व नसरीन पठाण हिला समजावुन सांगीतले होते. तसेच २२ नोव्हेंबर २०२५ रोजी नसरीन पठाण ही माझे घरी मला भेटण्यासाठी आली असता, मी तिला सांगितले की, माझ्या मुलासोबत बोलु नको, असे समजावुन सांगीतले होते.
२४ नोव्हेंबर २०२५ रोजी माझा मुलगा यश उर्फ विकास नगराळे हा रात्री ७/३० वाजताच्या सुमारास शेतात जागली करीता गेला होता. २५ नोव्हेंबरच्या सकाळी ८ वाजता घरी परत आला. त्यानंतर रात्री ९/३० वाजताच्या सुमारास शेतात जातो असे सांगुन तो पुन्हा शेतात गेला. त्यानंतर मी यश उर्फ विकास नगराळे यांस जेवन करण्याकरीता फोन केला असता, माझा मुलगा यश उर्फ विकास हा फोन उचलत नव्हता. त्यामुळे मी शेतात बोलावण्याकरीता गेली असता, माझा मुलगा यश उर्फ विकास दत्ता नगराळे (वय १७) याने शेतात जागली करीता बांधण्यात आलेले अटाळीला नायलन दोराच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे दिसुन आले. मी त्यास खाली उतरवून आवाज दिला असता, मुलगा यश उर्फ विकास नगराळे हा मरण पावल्याचे दिसुन आला.
तरी माझा मुलगा यश उर्फ विकास दत्ता नगराळे याने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबत मला काहीही माहिती नाही, असा जबानी रिपोर्ट दिला. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गोपाल राठोड पुढील तपास करीत आहे.
दरम्यान, सद्यातरी मृतकाचा वैद्यकीय अहवाल पारवा पोलीसांना प्राप्त झाला नसुन मृतकाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच तपासाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे पारवा पोलीसांनी सांगितले.
News - Rajy




Petrol Price




