कुरखेडा तालुक्यात पोलिस - नक्षल चकमक, एका नक्षल्याचा खात्मा


- पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या कार्यकाळातील पहिलीच कारवाई 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील गुरियलदंड जंगल परिसरात आज १६ आॅक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास पोलिस - नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार सकाळी पोलिस जवान नक्षलविरोधी शोधमोहीम राबवित असताना नक्षल्यांसोबत चकमक उडाली. यावेळी चकमकीत एक नक्षली ठार झाला. नक्षल्याचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. घटनास्थळावरून एक रायफल जप्त करण्यात आली आहे. 
तत्कालीन पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्या कार्यकाळात भामरागड तालुक्यातील कसनासूर आणि अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरात झालेल्या चकमकींमध्ये तब्बल ४० हून अधिक नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीनंतर नक्षली मारल्या जाण्याची  ही पहिलीच घटना आहे. कसनासूर आणि जिमलगट्टा परिसरातील चकमकीनंतर अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले होतेे. डाॅ. देशमुख यांचे स्थानांतरण झाल्यानंतर शैलेश बलकवडे हे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून रूजू झाले. ते रूजू झाल्यापासून अनेक चकमकी झाल्या. तसेच अनेक मोठ्या नक्षल्यांनी आत्मसमर्पणसुध्दा केले. मात्र चकमकींमध्ये नक्षल्याचा खात्मा करण्यात आल्याची पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच घटना आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-16


Related Photos