महत्वाच्या बातम्या

 खापरी नाक्याजवळ अवैधरित्या खैर प्रजातीच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या टाटा ४०७ वन विभागाने केला जप्त 


विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटंजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध लाकडाची तस्करीत वाढ होतांना दिसून येत आहे. अश्यातच घाटंजी वनपरिक्षेत्र कार्यालयातंर्गत अवैद्य लाकूड तस्करी करणाऱ्यावर कर्दनकाळ बनले आहे.

घाटंजी वनविभाग नेहमी प्रमाणे रात्र गस्तीवर असतांना गोपनीय बातमीदारांकडून खैर जातीच्या लाकडाची अवैद्य वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली. तेव्हा घाटंजी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे हे घाटंजी ते यवतमाळ रस्त्यावरील खापरी नाक्याजवळ दि. ४ नोव्हेंबर रोजीच्या पहाटेच्या सुमारास सापळा रचला. तेव्हा भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन क्र. एम. एच.२९ / ९२३२ या टाटा - ४०७ वाहनाला थांबविण्यात आले असता ते थांबले नाही. तेव्हा, घाटंजी येथील वनविभागाला संशय आला. तेव्हा घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे व वनविभागाच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन काही अंतरावर वाहन थांबवले व त्यातील आरोपी व वाहन चालक यांनी वाहन सोडून पळ काढला. त्यावेळी वन विभागाच्या कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून पाठलाग केला असता काळोख अंधार असल्याने आरोपी पसार झाले.

त्यावेळी संबंधित वाहनाची पाहणी केली असता अवैध खैर प्रजातीच्या लाकडे २८ नग ०.४६२ घन. मीटर व टाटा - ४०७ असे एकूण अंदाजे किंमत २ लाख १० हजाराचा मुद्देमाल घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे व वन विभागाच्या पथकाने जप्त केला. वाहनातून पसार झालेल्या आरोपी विरुद्ध वनविभागाने वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२, ५२ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ३१, ३७ चे अन्वये वन गुन्हे नोंद करण्यात आले आहे. घाटंजी कार्यालयाकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पांढरकवडा येथील उपवन संरक्षक धनंजय वायभासे, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन  नेहारे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक प्रकाश मुंढे, अक्षय चाणेकर, पंकज भुसारी, दामोदर नेवारे, नरेश येन्नरवार, वाहन चालक निलेश आगरकर आदींनी यशस्वी कामगिरी केली.





  Print






News - Rajy




Related Photos