महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायती निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या एकूण २८८ सदस्यपदांसाठी आणि थेट अध्यक्षपदासाठी मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होईल. आजपासून संबंधित सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होऊन, १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जाची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल. निवडणूक निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर, तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर २०२५ असेल. मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

राज्यभरातील प्रमुख नगरपरिषदा व नगरपंचायतींची यादी -

पालघर : डहाणू, जव्हार, पालघर, वाडा

रायगड : अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण

रत्नागिरी : चिपळूण, देवरुख, गुहागर, खेड, लांजा, राजापूर, रत्नागिरी
सिंधुदूर्ग : कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला
ठाणे : अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर
अहिल्यानगर : देवळाली प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर
धुळे : दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, सिंदखेडा, शिरपूर-वरवाडे
जळगाव : जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदूणी, वरणगाव, यावल
नंदुरबार : शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा
नाशिक : भगुर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवाड, इगतपुरी, ओझर, पिंपळगाव बसवंत, त्र्यंबक
कोल्हापूर : आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ, वडगाव
पुणे : आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव-दाभाडे, वडगाव
सांगली : आष्टा, आटपाडी, इस्लामपूर, जत, पळूस, शिराळा, तासगाव, विटा
सातारा : कराड, महाबळेश्वर, मलकापूर, मेढा, म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा, वाई
सोलापूर : अक्कलकोट, अकलूज, अनागर, बार्शी, दुधनी, करमाळा, कुडूवाडी, मैदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला
बीड : अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, परळी वैजनाथ
छत्रपती संभाजीनगर: फुलब्री, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, वैजापूर
धाराशिव : भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर, उमरगा
हिंगोली : बसमतनगर, हिंगोली, कळमनुरी
जालना : अंबड, भोकरदन, परतूर
लातूर : अहमदपूर, औसा, निलंगा, रेनापूर, उदगीर
नांदेड : बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा
परभणी : गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ
अकोला : अकोट, बाळापूर, बार्शी-टाकळी, हिवरखेडा, मूर्तिजापूर, तेल्हारा
अमरावती : अचलपूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, शेंदूरजनाघाट, वरुड
बुलढाणा : बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदूरा, शेंगाव, सिंदखेडराजा
वाशीम : कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, वाशीम
यवतमाळ : आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, ढाणकी, नेर-नबाबपूर, पांढरकवडा
भंडारा : पवनी, साकोली, शेंदूरवाफा, तुमसर, भंडारा
चंद्रपूर : बल्लारपूर, भद्रावती, भिसी, ब्रह्मपूरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, मूल, नागभीड, राजूरा, वरोरा
गडचिरोली : आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली
गोंदिया : गोंदिया, गोरेगाव, सालेकसा, तिरोडा
नागपूर : बहादुरा, बेसा पिपळा, भिवापूर, बुटिबोरी, डिगडोह, कळमेश्वर-ब्रह्मणी, कामठी, कांद्री कन्हान, काटोल, खापा, कोंढाळी, महादुला, मोहपा, मौदा, नरखेड, निलडोह, पारशिवणी, रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी, बिडगाव-तरोडी, पांढुर्णा, गोधणी रेल्वे, कन्हान-पिपरी, मोवाड, वाडी, येरखेडा
वर्धा : आर्वी, देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे, वर्धा





  Print






News - Rajy




Related Photos