पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर २६ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
२६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता नालवाडी ते म्हसाळा रस्त्याचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता सर्कस मैदान येथे आयोजित वर्धा क्रिकेट चॅम्पियन्स लिग टुर्नामेन्ट कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२ वाजता दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ऑडिटोरियम सावंगी मेघे येथे आयोजित ई-भूमीपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.
सायंकाळी ७ वाजता पिपरी मेघे येथील ग्रामपंचायत सुविधा केंद्राच्या नुतणीकरण केलेल्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. व राखीव २७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६.१५ वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रयाण करतील.
News - Wardha




Petrol Price




