सन २०२६-२७ या वर्षाची खरीप पिकाची सुधारित पैसेवारी जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : खरीप पिकाची सुधारित पैसेवारी तहसिलदार यांचे कडून प्राप्त माहितीच्या आधारे संकलित करुन गडचिरोली जिल्ह्याची सन २०२६-२७ या वर्षाची खरीप पिकाची सुधारित पैसेवारी जाहिर करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८९ गावे असून खरिप पिकाची गावे १६२३ आहेत व एकूण पिका खालील क्षेत्राच्या २/३ क्षेत्रामध्ये खरिप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गांवाची संख्या ०४ आहेत. त्यापैकी खरीप गावामध्ये पीक नसलेली गांवे ५४ आहेत. सदर खरीप पिक असलेल्या गावांपैकी ५० पैशाचे आत पैसेवारी असलेले ३२६ असून, ५० पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण खरिप पिक असलेल्या गावांची संख्या १२४७ आहेत.
अशा प्रकारे एकूण १५७३ खरीप पिक असलेल्या गावाची सुधारित पैसेवारी जाहिर केलेली आहे. सबब गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगाम २०२६-२७ या वर्षाची सुधारित पैसेवारी ०.६३ आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.




Petrol Price




