महत्वाच्या बातम्या

 ५ जानेवारीला समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा


- समाजवादी पक्षाचा होणार मोठा विस्थार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : समाजवादी पार्टी गडचिरोलीच्या वतीने ५ जानेवारीला समाजवादी पार्टी पक्ष विस्थार कार्यक्रम अंतर्गत कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रम हा देसाईगंज येथील स्थानीय विश्राम ग्रूह या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रमुख महासचिव परवेज सीधीकी, महिला विभाग अध्यक्ष माया चवळे सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास बहुसंख्य समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. असे, आवाहन समाजवादी पार्टी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांनी केले आहे. 

समाजवादी पक्षातर्फे मागील अनेक वर्षानपासून सामान्य जनतेच्या प्रश्नानंवर शहरातील योग्य मुद्द्यांना घेऊन देसाईगंज शहरात आंदोलन मोर्चा काढण्यात आली आहेत़. कमी वेळात आपली वेगळी ओडख जिल्ह्यात समाजवादी पक्षाने निर्माण केले आहे. नवीन वर्षात समाजवादी पक्षाच्या मोर्चा बांधणी नें सत्ताधारी राजकीय पक्षात खळबळ माजली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos