पीएम यशस्वी योजनेंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील शाळांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच शालेय स्तरावर शिक्षणाच्या अधिक संधी मिळाव्या यासाठी ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण ही योजना पीएम-यशस्वी अंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमधील ९ वी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी शाळेच्या मार्गदर्शनाखाली योजनेची माहिती घेऊन लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज सादर करण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरील संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक किशोर भोयर यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




