महत्वाच्या बातम्या

 सिरोंचा येथील हिंदू देवीदेवतांचे अपमान प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींवर कठोर कारवाई करा : माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम


- रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : येथे एका कार्यक्रमात बैरी नरेश ह्या वक्त्याने केलेले भाषण आणि हिंदू देवीदेवतांबद्दल केलेली टिप्पणी आणि अपमान अतिशय चिड आणि राग आणणारे आहे.  प्रशासन हे प्रकरण गांभिर्याने न घेता थातुर मातुर कारवाई करुन स्वत:ची सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे  दृष्टीक्षेपात येत आहे, त्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखे होत आहे. आयोजकांनी संपुर्ण बेकायदेशीर कार्यक्रम आयोजीत केला असे, ऐकण्यात आले आहे. जमावबंदी ३७ कलम लागू असतांना ह्या कार्यक्रमाला परवानगी कशी मिळाली याचेही सुध्दा चौकशी करावी. लवकरात लवकर दोषींना अटक करुन आयोजकांवर गंभीर गुन्हा नोंदवायला पाहीजे अन्यथा तिव्र आणि व्यापक आंदोलन करु व प्रसंगी रस्त्यावर ही ऊतरु, असा इशारा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी प्रशासनाला दिले असून याबद्दल त्वरीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे ही त्यांनी सांगीतले आहे.

मागील काही कालावधी पासुन अशा घटना वारंवार घडतांना आढळत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. याला आळा बसायला पाहीजे अन्यथा आमच्या शांत परिसराचे वातावरण बिघडविण्यापासुन वाचविण्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी ही राजे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos