महत्वाच्या बातम्या

 डल सरोवरातून पाकिस्तानी फतह-१ क्षेपणास्त्र सापडले


विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / श्रीनगर (जम्मू काश्मीर) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाडण्यात आलेले पाकिस्तानी फतह-१ क्षेपणास्त्र आता डल सरोवरातून सापडले आहे. शनिवारी सरोवर संरक्षण व व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना नियमित स्वच्छतेदरम्यान ही क्षेपणास्त्रासारखी वस्तू आढळली. कर्मचाऱ्यांनी ती तातडीने पोलिसांच्या ताब्यात दिली असून पुढील तपास सुरू आहे.

श्रीनगर हादरवणारे स्फोट -
१० मे रोजी ऑपरेशन सिंदूरदरम्यान श्रीनगर हादरवणारे जोरदार स्फोट झाले होते. त्यावेळी एक क्षेपणास्त्र डल सरोवरात कोसळले होते. पाण्यावर धूर पसरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. आता हीच वस्तू म्हणजे पाकिस्तानी फतह-१ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी -
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची धर्म विचारून निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या मोहिमेत भारतीय सैन्याने PoK आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांचा नाश केला. शेकडो दहशतवादी ठार झाले.

पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला; मात्र भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने ते हल्ले निष्फळ ठरवले. या कारवाईत भारताने पाकिस्तानची ११ एअरबेस उद्ध्वस्त केली, अनेक विमाने पाडली. भारतीय सैन्याच्या जोरदार हल्ल्यांनंतर पाकिस्तानला केवळ चार दिवसांत शरणागती पत्करावी लागली आणि सीजफायरची मागणी करावी लागली.





  Print






News - World




Related Photos