महत्वाच्या बातम्या

 डिप्टी सिग्नल प्रकरण पेटले : दगडफेक, रस्ता रोको, १३ जणांविरोधात गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : डिप्टी सिग्नल पुलाखाली अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. संतप्त जमावाने दगडफेक करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी पोलिसांनाच धक्काबुक्की करत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महेंद्र फटिंग या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी डिप्टी सिग्नल पुलाखाली अपघात झाल्याची तक्रार केली होती. मात्र सीसीटीव्ही तपासात प्रत्यक्षात अपघात पारडी उड्डाणपुलावर झाल्याचे स्पष्ट झाले. तरीदेखील काही व्यक्तींनी खोटी माहिती पसरवून तणाव वाढविला.

दरम्यान, ३० ते ४० जणांनी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवून आंदोलन छेडले. रस्ता रोको करून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर दगडफेक करून वाहनांचे काच फोडण्यात आले व शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले.

सत्यता समोर आल्यानंतर पोलिसांनी उमाकांत अग्निहोत्री, रविनीश पांडे, भरत साळवे, शिव दयाराम बनपाले, वसंत सहारा, अतुल राघवर्ते, पप्पू निशाद, कश्यप मशरू, रितीश शाहू, महेश सुभाष यादव, राजा भवानी, भूषण सिलोठिया आणि लोकेश बनपेला यांच्यासह १३ जणांविरोधात बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos