अमरावती- वर्धा भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने लावली हजेरी


- कापूस-तूरचे मोठे नुकसान

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती :
शहरालगत बडनेरा आणि इतर ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.  कापूस   आणि तुरीला   या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांचा वेचणीला आलेला कापूस झाडावर ओला झाला . त्यामुळे आता त्याची पत खलावण्याची भीती आहे. तर तुरीचा बारही गळून पडला आहे. दरम्यान,  वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
हवामन विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज अमरावती शहरा लगतच्या बडनेरा व इतर ग्रामीण भागातही आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे झाडाला असलेला कापूस आणि तुरीला या अवकाळी पावसाचा जबर फटका बसला.
जोरदार वादळाला आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटातच मुसळधार पाऊस बरसल्याने शेतकरी पुन्हा हवालदील झाला आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कपाशी पिकाला याचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस वेचणीला आलेला कापूस झाडावर असल्याने तो कापूस ओला झाला. त्यामुळे त्याची पत खलावणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर तूरीचा बारही गळून पडला आहे.
दरम्यान, वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. शहरात धुवांधार पाऊस झाला.  आधीच नुकसान झाले असताना पुन्हा पाऊस सुरु झाल्याने शेतीला फटका बसला आहे.   ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस कोसळला. या पावसाचा फटका वीजपुरवठा खंडित झाला आहे.  कपाशी आणि तूर पिकाच्या नुकसानीची शक्यता आहे.  वाचलेला कापूस झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आली. 

 
  Print


News - Rajy | Posted : 2020-11-20


Related Photos