महत्वाच्या बातम्या

 पोटेगाव आश्रमशाळेतील आरोग्य शिबिराला जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट


- दिशा आरोग्य व स्वच्छता शिक्षण:तपासण्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : दिशा आरोग्य व स्वच्छता शिक्षण कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभाग व पिरामल फाउंडेशन यांच्या मार्फत बुधवार २८ डिसेंबरला शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पोटेगाव येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराला गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याच प्रमाणे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून उपयुक्त मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून जिल्हा कार्यक्रमांतर्गत एज्युकेट गडचिरोली फेलोशीपच्या माध्यमातून गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील दहा शासकीय आश्रम शाळेत दिशा आरोग्य व स्वच्छता शिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ब्लड ग्रुप, सिकलसेल , मलेरिया, बी. एम. आय., एच. बी., डोळे , दात आदी तपासण्यासह विद्यार्थ्यांची उंची, वजन घेण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय जठार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, ए. आ. वि. प्रकल्प गडचिरोलीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, पोटेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा कुमरे , डॉ. विनोद बिटपल्लीवार, डॉ. उमेश सिडाम, डॉ. आरती मंगरे, प्रभारी मुख्याध्यापक सुधीर शेंडे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके, अधीक्षक एस. आर. जाधव, अधीक्षिका एल.आर. शंभरकर, पिरामल फाउंडेशनचे राहुल बारचे, ज्ञानेश्वर कल्याणकर, एज्युकेट फेलो स्मिता हेमके , माध्यमिक शिक्षक डॉ. एस. डी. गोटमवार, प्रमिला दहागावकर, एन. पी. नेवारे, मोहिता गोरेकर, विलास मापारी, पवन सोयाम, साहेबराव दाभाळे, हनुमंत बुरेवार, शिरीष कुंभलकर, प्रशांत खोब्रागडे, पी. बी. म्हशाखेत्री, गणेश गेडाम, आरबीएसके व आरकेएसके टीम आदींसह स्थानिक आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. भेटी दरम्यान जिल्हाधिकारी संजय मीना यांनी पोटेगाव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी आरोग्य व स्वच्छता शिक्षण, अभ्यासक्रम तसेच परीक्षा संबंधी संवाद साधला व मार्गदर्शन केले. मनमोकळीक चर्चा केली. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. प्रत्येक वर्गाला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos