महत्वाच्या बातम्या

 जि. प. माजी अजय कंकडालवार यांच्या हस्ते वेडमपल्ली येथील पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन


- स्थानिक जनतेला येजा करण्यास सोईस्कर होईल व परिसरातील शेतकरी होणार सुजलाम सुपलाम 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या वेडमपल्ली गावातील नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी जिल्हा परिषदेचे माजी अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून ७० लक्ष रु. निधी मंजूर करण्यात आले. या पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन सोहळा वेडमपल्ली गावातील नाल्यावार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हस्ते उत्साहात पार पडला. वेडमपल्ली येथील नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम न झाल्याने  येथील स्थानिक  नागरिकांना व शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाळ्यात नाहक त्रास होत होता. मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वतःनाल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केले होते. व या नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिले होते. जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत तिमरम नाल्यावार पूल वजा बंधारा बांधकामासाठी जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले.जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी वेडमपल्ली येथील जनतेला दिलेल्या ग्वाही पूर्ण केल्याने येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अहेरी तालुक्यात मात्र माजी जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्ष बनले तेंव्हा या नाल्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना ये -जा करण्यासाठी पूल व परिसरातील शेतकऱ्यांसाठी बंधारा बांधून दिल्यास पावसाळ्यात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून चौत्यांदा तालुक्यात त्यांच्या संकल्पनेतून पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम  होत आहे. या पूल वजा बंधारा बांधकामाची येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकरी व  गावातील नागरिकांना याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

या पुलवजा बंधाऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, गुलाबराव सोयाम माजी सरपंच इंदाराम, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, विलास वेलादी ग्रा. प. सदस्य, लक्ष्मण गावडे, बापू वेलादी, अविनाश कुमरे, शिवराम सिडाम, बिचेंगा गावडे, नरेंद्र वेलादी, संजय वेलादी, तुकाराम वेलादी, भगवान सिडाम, लचमा वेलादी, संतोष वेलादी, प्रमोद गोडसेलवार, नरेंद्र गर्गम मलेश तलांडी, भाष्कर गावडे, उमेश गावडे, सुरज गावडे, कटिया तलांडी, पाटाळी पल्लो, प्रकाश गावळे, गिरमा वेलादी, महेश कुमरे, तुकाराम वेलादी, श्रीनिवास गावळे, अविनाश कुमरे नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos