सूर्यडोंगरीच्या दारूबंदीसाठी आठ गावांतील महिलांचा गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा


- दारूबंदी करण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी दिले आश्वासन 
- देलोडा बूज , इंजेवरी, पेठतुकूम, देऊळगाव, डोंगरसावंगी, किटाळी, आकापूर, चुरमुरा या गावांतील महिलांचा समावेश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आरमोरी तालुक्यातील सूर्यडोंगरी येथे पोलिसांना न जुमानता जोमाने दारू विक्री व्यवसाय सुरु असून याचा त्रास शेजारील दारूबंदी असलेल्या गावांना सहन करावा लागत आहे. म्हणून येथील दारूबंदी करण्याची मागणी घेऊन देलोडा (बूज), इंजेवारी, पेठतुकूम , देऊळगाव, डोंगरसावंगी, चुरमुरा, किटाळी या गावांतील शेकडो महिलांनी गडचिरोली उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांना निवेदन सादर करण्यात आले . यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी महिलांशी सकारात्मक चर्चा करून दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले . 
देलोडा (बूज), इंजेवारी, पेठतुकूम , देऊळगाव, आकापूर ,डोंगरसावंगी, चुरमुरा, किटाळी या गावांत सुरु असलेली अवैद्य दारू बंद करण्यासाठी  गाव संघटना तयार केली आहे. व गावातील अवैद्य दारू विक्री बंद केली आहे. परंतु गावाच्या बाजूचे सूर्यडोंगरी या गावात अवैद्य दारूविक्री सुरु आहे. तसेच सूर्यडोंगरी शेजारील संपूर्ण जंगल परिसरात दारू काढण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे आमच्या गावातील लोक तेथे जाऊन पिऊन येतात. व गावामध्ये झगडा भांडण करतात तसेच महिलांना नको त्या शब्दात बोलतात. त्यामुळे आम्ही आमच्या गावात केलेली दारूबंदी अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे इंजेवरी, पेठतुकूम, देऊळगाव, डोंगरसावंगी, किटाळी, आकापूर, चुरमुरा, डेलोडा बूज, या गावांमध्ये गाव संघटनेमार्फत दारूविक्री बंद करण्यात आली आहे. मात्र सूर्याडोंगरी मध्ये ८० टक्के लोक दारूविक्री व्यवसाय करीत असल्यामुळे शेजारील वरील सर्व गावांना त्याचा त्रास होत आहे. 
यापूर्वी पोलीस स्टेशन आरमोरी येथे सूर्याडोंगरी बाबत दोनदा लेखी तक्रार देण्यात आली होती. तसेच पोलीस विभागातर्फे कारवाई करण्यात आली होती.तरी सुद्धा पोलिसांना न जुमानता दारूविक्रेत्यांनी आपले धंदे तसेच सुरु ठेवले आहे. तेव्हा सूर्यडोंगरी गावाची दारूविक्री बंद करण्यासाठी विशेष दखल घेण्याची मागणी देलोडा बूज , इंजेवरी, पेठतुकूम, देऊळगाव, डोंगरसावंगी, किटाळी, आकापूर, चुरमुरा या गावांतील महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्याकडे निवेदनातून केली आहे . यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी महिलांना दारूबंदीसाठी मार्गदर्शन करून सूर्यडोंगरी येथील दारू विक्री बंद करण्याची अश्वासन दिले . 
   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-12


Related Photos