सरकारने आणली 'सेक्स'वर बंदी : कोरोना काळात अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
युनायटेड किंग्डममध्ये कोरोना व्हायरसचा कहर निर्माण झाला आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचा कहर थांबत नाही. अशा परिस्थितीत सरकारने लॉकडाऊनचा नियम लावला. मात्र याबरोबरच आता सरकारने 'सेक्स बंदी' आणली आहे. याची जोरदार सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 
पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रवक्ताने म्हटले  की, 'काही हॉटस्पॉटमध्ये कपल्स आणि सिंगल राहणाऱ्या लोकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यांनी सोशल डिस्टेन्सिंगचे सर्व नियम सांभाळावे लागतील. या भेटीत ते एकमेकांना स्पर्श पण करू शकत नाहीत. 
इंग्लंडची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या सध्या करोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायकच नव्हे, तर अति धोकादायक झोनमध्ये आहे. त्यामुळे काहींच्या मते पुढच्या काही महिन्यांमध्ये सेक्स हा करोनाप्रसाराला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतो. ते रोखण्यासाठी हा नवीन नियम करण्यात आला असून, त्यानुसार एकत्र राहणारे आणि त्याच ‘सपोर्ट बबल’मध्ये राहणारे लोक लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना एकांतात भेटू शकतात. 
कोरोनाच्या काळात तीन भाग करण्यात आले आहेत. टिअर १, टिअर २, टिअर ३. यामधील टिअर २ आणि टिअर ३ मध्ये हाय रिस्क आणि सर्वाधिक रिस्कचा समावेश आहे. टिअर १ मध्ये मीडिअम रिस्क असणाऱ्या भागात कव्हर करणार आहेत. नवीन नियमानुसार, हाय रिस्क आणि सर्वाधिक रिस्क असणाऱ्या विभागातील लोकांना एकमेकांना भेटण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. एवढंच नव्हे तर कपल्सच्या कॅच्युअल सेक्सवर देखील बंदी ठेवण्यात आली आहे. यामागील महत्वाचा मुद्दा की कपल्समधील ट्रान्समिशनला रोखणे  असे आहे. 
  Print


News - Rajy | Posted : 2020-10-19


Related Photos