गडचिरोली जिल्हयात आज आढळले ११३ नवे कोरोनाबाधित तर १४६ जण झाले कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
एकुण सक्रिय बाधितांमधील आज 146 जणांनी कोरोनावर मात केली. तर आजही 113 नवीन कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकुण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा 921 झाला. आत्तापर्यंतची एकुण कोरोना बाधित संख्या 3618 वर पोहचली आहे. यापैकी 2676 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यानुसार 73.96 टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सद्या जिल्हयात आहे. सक्रिय रूग्णांची टक्केवारी 25.46 असून मृत्यूदर 0.58 टक्के आहे.
आजच्या 146 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 70, अहेरी 7,  आरमोरी 8, भामरागड 7, चामोर्शी 8, धानोरा 16, एटापल्ली 6, मुलचेरा 2, सिरोंचा 0, कोरची 3,  कुरखेडा 4 व वडसा येथील 15 जणांचा समावेश आहे. तसेच आज नवीन 113 बाधितांमध्ये गडचिरोली 06, अहेरी 09, चामोर्शी 05, आरमोरी 27, भामरागड 00, धानोरा 31, एटापल्ली 19, कोरची 02, कुरखेडा 04, मुलचेरा 00, सिरोंचा 00 व वडसा येथील 10 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 6 बाधितांमध्ये मुरखळा 1, साईनगर 1, सोनापूर वसाहत 1 व बाकी गडचिरोली शहरातील आहेत. अहेरी 9 मध्ये 8 स्थानिक तर 1 गुरूजा अहेरी येथील आहे. आरमोरी 27 मध्ये डोंगरगाव 1, गोगाव 1, रामाला 1, शिवनीभूज 1 व इतर सर्व शहरातील आहेत. चामोर्शी 5 मध्ये तळोधी मोकासा 2, मकेपल्ली 1, भेंडाळा 1 व सोनापूर 1 जणाचा समावेश आहे. धानोरा 31 मध्ये कोसमटोला 1, पोलीस स्टेशन चातगाव मधील 18 जण आहेत, गोधलवाही पोलीस स्टेशन मधील 3 जण आहेत व पोलीस स्टेशन कटेझरी च्या 9 जणांचा समावेश आहे. एटापल्ली 19 मध्ये बिद्री 1, सिआरपीएफ 9, शहरातील 4, हेडरी पोलीस 3, नगरपंचायत 1 व रेंगाटोला 1 जणाचा समावेश आहे. कोरची 2 मध्ये बिहीटेकाळा 1 व स्थानिक 1 जणाचा समावेश आहे. कुरखेडा 4 मध्ये वाडेगाव 1, सोनसरी 1 व स्थानिक 2 जणांचा समावेश आहे. वडसा 10 मध्ये आमगाव 1, गांधी वार्ड 1, कोकडी 2, कुरूड 1, मधुवन कॉलनी 3, एसआरपीएफ 1 व शहरातील इतर 1 जणाचा समावेश आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-10-08


Related Photos