वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार : जेप्रा येथील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शेतावर काम करणाऱ्याकरीता गेलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत दिभना गांवानजीकच्या शेतात घडली. ताराबाई बाबुराव लोनबले (७०) रा. जेप्रा असे मृत महिलेचे नाव आहे.
ताराबाई लोनबले ही शेताचे काम करीत असताना झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला. यात ती गतप्राण झाली. वाघाने तिला काही अंतरावर फरफटत नेले. माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. परिसरात टी-६ वाघिणीचा वावर असून तिने दहा दिवसांपूर्वी चार बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे तिनेच वृद्धेवर हल्ला केला असावा, असा अंदाज आहे. या वाघिणीसंदर्भात वनविभागाने आधीच सतर्कतेच्या सूचना दिले आहेत.
News - Gadchiroli