धोडराज येथील नागरिकांनी नक्षलविरोधी बॅनर लावून दर्शविला नक्षल सप्ताहाला तीव्र विरोध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील धोडराज येथील नागरिकांनी आज, २६ जुलै रोजी नक्षलविरोधी बॅनर लावून २८ जुलैच्या नक्षल सप्ताहाला तीव्र विरोध दर्शविला आहे. आम्ही आदिवासी जनतेने कशासाठी नक्षल सप्ताह पाळावा ? नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताहात हत्या, जाळपोळ करुन दहशत निर्माण करतात आणि आदिवासी जनतेला भयभीत करीत असतात. मग तो नक्षल सप्ताह आमच्या काय कामाचा ? आमच्या आदिवासी समाजाकडून कोणताही नक्षल सप्ताह पाळला जाणार नाही अश्या प्रकारचे बॅनर धोडराज येथील मुख्य चौकात व नेलगुंड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावून आदिवासी जनतेला वेठीस धरणाऱ्या नक्षलवाद्यांना नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-26


Related Photos