गडचिरोलीत ६५ एसआरपीएफ जवानांसह इतर २ कोरोना पॉझिटिव्ह, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना वार्डातील कर्मचाऱ्याचाही समावेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
काल  २४ जुलै रोजी रात्री गडचिरोली येथील विलगीकरणातील दौंड पुणे येथून आलेले एसआरपीएफचे ६२ जवान, कीटाळी आरमोरी येथील ३  एसआरपीएफचे जवान कोरोना बाधित आढळून आले. तसेच इतर २  मध्ये रशिया होऊन परतलेला आरमोरी येथील एकजण गडचिरोली येथे विलगीकरनात ठेवण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना वार्डातील एक कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त २३५ तर सद्या सक्रिय कोरोनाबाधित २७२ झाले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधित संख्या ५०८ झाली आहे. एकुण संख्येमध्ये ३६४ सुरक्षा दलाचे जवान कोरोना आढळून आले आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-25


Related Photos