सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसई दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १८ लाख ८९ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात ७ लाख ८८ हजार १९५ विद्यार्थीनी आणि ११ लाख १ हजार ६६४ विद्यार्थी होते तर १९ ट्रान्सजेंडर होते.
cbse.nic.in ,  cbseresults.nic.in या संकेतस्थळांवर सीबीएसईच्या  दहावीचा निकाल पाहता येईल तसेच निकाल विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे देखील मिळू शकेल. तुम्हाला केवळ एक एसएमएस तुमच्या मोबाइलवरून पाठवायचा आहे. यासाठी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन - cbse10 12345678 असं टाइप करून 7738299899 या क्रमांकावर पाठवा. लक्षात घ्या येथे 12345678 ऐवजी तुमचा रोल नंबर टाइप करा. म्हणजेच cbse10 रोल नंबर हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवताच तुमच्या निकालाचा मेसेज तुमच्या मोबाइलवर येईल.
  Print


News - World | Posted : 2020-07-15


Related Photos