महत्वाच्या बातम्या

 हिवाळी अधिवेशनासाठी लिपिक व शिपाई पदांच्या २६ व २८ रोजी मुलाखती


- उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन 

 विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून नागपूर येथे सुरू होत असून या कालावधीतील कामकाजासाठी लिपिक-टंकलेखक व शिपाई/संदेशवाहकांच्या पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येत आहे. ही भरती पूर्णपणे हंगामी स्वरुपाची असून या अंतर्गत लिपिक -टंकलेखक पदाची एकूण १०  व शिपाई/संदेशवाहकांची एकूण २४ पदे भरण्यात येणार आहेत.

या दोन्ही पदांसाठी अर्ज केलेल्या सर्व संबंधित उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपली सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेऊन दिलेल्या वेळी विधानभवन, नागपूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त निता औघड यांनी विधान मंडळ सचिवालय, विधान भवन यांच्या वतीने केले आहे.

शिपाई/संदेशवाहक पदाची मुलाखत २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३०  वाजता व लिपिक-टंकलेखक पदाची टंकलेखन चाचणी परीक्षा व मुलाखत २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता विधानभवन, नागपूर येथे आयोजित करण्यात आली असल्याचे सहायक आयुक्तांनी कळवले आहे. 





  Print






Related Photos