कुरखेड्याला चक्रीवादळाचा तडाखा, बीएसएनएलचे मोबाईल टाॅवरही कोसळले, विद्युत तारा कोसळल्याने वीज पुरवठा खंडित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
आज, २७ एप्रिल रोजी दिवसभर कडाक्याची उन्ह तापत असताना सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळ आले. या चक्रीवादळामुळे कुरखेडा येथील भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीचे मोबाईल टाॅवर जमिनीवर कोसळले. त्यामुळे कुरखेडा शहर व परिसरातील बीएसएनएलची सेवा सायंकाळपासून बंद झाली आहे. शिवाय या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली असून विद्युत तारा सुद्धा कोसळल्या. त्यामुळे वीज पुरवठा सायंकाळी ६ वाजतापासून खंडित झाला आहे. त्यामुळे कुरखेडा शहरासह परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. दिवसभर सूर्य प्रचंड आग ओकत असतानाच सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल पडला. गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारा सुटला व पाउसही पडला. कुरखेडा परिसराला तर चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. या वादळामुळे कुरखेडा येथील बीएसएनएलचे टाॅवर कोसळले. तसेच परिसरातील अनेक ठिकाणी झाडे आणि विद्युत ताराही कोसळल्या. त्यामुळे बीएसएनएलची मोबाईल व फोन सेवा बंद झाली असून वीज पुरवठा सुद्धा खंडित झाल्याने कुरखेडा परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-27


Related Photos