कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्रिपद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्हयाच्या पालकत्वाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात लाॅकडाउन लागू करण्यात आला आहे. अशातच प्रत्येक जिल्हयातील जिल्हा प्रशासन आपल्या स्तरावर योग्य अमंलबाजावणी करत आहे. शासन निर्णय दि. ८ जानेवारी २०२० , १५ जानेवारी २०२० व ३१ मार्च २०२० नुसार उपमुख्यमंत्री, मंत्री व राज्यमंत्री यांच्या जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परंतु आता कोविड-१९ (कोरोना) संकटाच्या पार्श्ववभूमीवर ८ जानेवारी २०२० व १५ जानेवारी २०२० च्या शासन निर्णयात अंशतः बदल करून गडचिरोली जिल्हयाच्या पालकमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे तर भंडारा जिल्हयाच्या पालकमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार ना. सुनिल केदार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आला आहे. याआधि गडचिरोली जिल्याचे पालकत्व ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे होते व भंडारा जिल्हयाचे पालकत्व ना. डाॅ. विश्वजित कदम यांच्याकडे होते.  याचप्रमाणे उर्वरित जिल्हयांच्या पालकमंत्रीपदाच्या नेमणूका शासन निर्णय ८ जानेवारी २०२०, १५ जानेवारी २०२०  व ३१  मार्च २०२० प्रमाणेच कायम राहणार आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-16


Related Photos