सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने ९२ आस्थापनांची तपासणी करून १७० अन्ननमुने विश्लेषणासाठी घेतले. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्याने ५१ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या. यापैकी १० आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. तसेच भेसळीच्या संशयावरून १५ प्रकरणांत अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

दरम्यान, १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध अन्न आस्थापनांमधून एकूण ३१६ अन्ननमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी २१० नमुने प्रमाणित घोषित झाले असून ९६ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तीन नमुने कमी दर्जाचे, पाच नमुने मिथ्याछाप, तर दोन नमुने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी आठ प्रकरणांत न्यायनिर्णयासाठी सहआयुक्त, नागपूर यांच्याकडे खटले दाखल करण्यात आले असून उर्वरित प्रकरणांत पुढील कारवाई सुरू आहे.

याच कालावधीत जिल्ह्यातील २४३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळल्याने १३५ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या, तर १० आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. २९ आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून २ लाख २० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून १५ प्रकरणांत ३६ लाख रुपये किमतीचा ८ हजार ९८८ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा mahafda या संकेतस्थळावर तक्रार नोंदविता येणार आहे. तक्रार करताना स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि तक्रारीशी संबंधित अन्नपदार्थाची सविस्तर माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम व नियमन २०११ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करूनच व्यवसाय करावा. नागरिकांना निर्भेळ आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार असून अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. याबाबतची माहिती चंद्रपूरचे सहायक आयुक्त प्र.अ. उमप यांनी दिली.

" /> सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने ९२ आस्थापनांची तपासणी करून १७० अन्ननमुने विश्लेषणासाठी घेतले. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्याने ५१ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या. यापैकी १० आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. तसेच भेसळीच्या संशयावरून १५ प्रकरणांत अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

दरम्यान, १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध अन्न आस्थापनांमधून एकूण ३१६ अन्ननमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी २१० नमुने प्रमाणित घोषित झाले असून ९६ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तीन नमुने कमी दर्जाचे, पाच नमुने मिथ्याछाप, तर दोन नमुने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी आठ प्रकरणांत न्यायनिर्णयासाठी सहआयुक्त, नागपूर यांच्याकडे खटले दाखल करण्यात आले असून उर्वरित प्रकरणांत पुढील कारवाई सुरू आहे.

याच कालावधीत जिल्ह्यातील २४३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळल्याने १३५ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या, तर १० आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. २९ आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून २ लाख २० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून १५ प्रकरणांत ३६ लाख रुपये किमतीचा ८ हजार ९८८ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा mahafda या संकेतस्थळावर तक्रार नोंदविता येणार आहे. तक्रार करताना स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि तक्रारीशी संबंधित अन्नपदार्थाची सविस्तर माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम व नियमन २०११ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करूनच व्यवसाय करावा. नागरिकांना निर्भेळ आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार असून अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. याबाबतची माहिती चंद्रपूरचे सहायक आयुक्त प्र.अ. उमप यांनी दिली.

"/>
महत्वाच्या बातम्या

 भेसळीच्या संशयावरून ३६ लाखांचे अन्नपदार्थ जप्त : एफडीएची धडक कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविली आहे. या मोहिमेदरम्यान भेसळीच्या संशयावरून तब्बल ३६ लाख रुपये किमतीचा ८ हजार ९८८ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. खाद्यतेल, खवा, मिरची पावडर, हळद, धने पावडर, विविध मसाले, गूळ, शेंगदाणे आणि चहा पावडर आदी पदार्थांचा यात समावेश आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने ९२ आस्थापनांची तपासणी करून १७० अन्ननमुने विश्लेषणासाठी घेतले. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्याने ५१ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या. यापैकी १० आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. तसेच भेसळीच्या संशयावरून १५ प्रकरणांत अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

दरम्यान, १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध अन्न आस्थापनांमधून एकूण ३१६ अन्ननमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी २१० नमुने प्रमाणित घोषित झाले असून ९६ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तीन नमुने कमी दर्जाचे, पाच नमुने मिथ्याछाप, तर दोन नमुने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी आठ प्रकरणांत न्यायनिर्णयासाठी सहआयुक्त, नागपूर यांच्याकडे खटले दाखल करण्यात आले असून उर्वरित प्रकरणांत पुढील कारवाई सुरू आहे.

याच कालावधीत जिल्ह्यातील २४३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळल्याने १३५ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या, तर १० आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. २९ आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून २ लाख २० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून १५ प्रकरणांत ३६ लाख रुपये किमतीचा ८ हजार ९८८ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा mahafda या संकेतस्थळावर तक्रार नोंदविता येणार आहे. तक्रार करताना स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि तक्रारीशी संबंधित अन्नपदार्थाची सविस्तर माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम व नियमन २०११ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करूनच व्यवसाय करावा. नागरिकांना निर्भेळ आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार असून अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. याबाबतची माहिती चंद्रपूरचे सहायक आयुक्त प्र.अ. उमप यांनी दिली.





  Print






Related Photos