अड्याळ मार्गावर १० लाख ४८ हजारांची दारू व मुद्देमाल जप्त, ४ आरोपींना अटक


- ब्रम्हपुरी पोलिसांची अवैध दारूतस्करांविरुद्ध कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / ब्रम्हपुरी :
ब्रम्हपुरी येथील पोलिस पथकाने अड्याळ मार्गावरील रेल्वे पुलाजवळ नाकाबंदी करून १० लक्ष ४८ हजार ८०० रुपयांची दारू व मुद्देमाल आज, २८ फेब्रुवारी २०२० रोजी जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या दारूची तस्करी करणारयांचे धाबे दणाणले आहे. नागपूरहून अड्याळमार्गे सावलीकडे अशोक लेलॅन्ड डोस व इंडिका विस्टा या वाहनाने देशी दारूची अवैधरित्या वाहतूक होणार आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली. यावरून ब्रम्हपुरी पोलिस पथकाने अड्याळ मार्गावरील रेल्वे पुलाजवळ आज, २८ फेब्रुवारी रोजी नाकाबंदी केली. दरम्यान, अशेाक लेलॅन्ड डोस वाहन (क्र. एमएच ४० वाय १७८२) व दुसरी इंडिका विस्टा वाहन (क्र. एमएच ३५० पी ६४०) यांची तपासणी केली असता अशोक लेलॅन्ड वाहनात २ लाख २० हजार रुपये किंमतीची २२ खरड्याच्या देशी दारूच्या बाॅक्समध्ये २२०० नग शिशा आढळून आल्या. तसेच इंडिका विस्टा वाहनात २८ हजार ८०० रुपये किंमतीची विदेशी दारू ओसी ब्ल्यू व बिअरचे 3 बाॅक्स आढळून आले. सदर दारूसह ५ लाख रुपये किंमतीची अशोक लेलॅन्ड व ३ लाख रुपये किंमतीची इंडिका विस्टा असा एकूण १० लक्ष ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत. सदर कारवाई चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरीचे पोलिस निरीक्षक मकेश्वर यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सय्यद, नाईक पोलिस काॅन्स्टेबल क्रिष्णा राॅय, पोलिस काॅन्स्टेबल अमोल गिरडकर, विजय मैंद, संदेश देवगडे, योगेश शिवणकर, अजय कटाईत यांनी केली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-02-28


Related Photos