नागपूर येथील अभ्यासगट बैठकीला जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती


- गडचिरोली जिल्ह्याच्या मांडल्या समस्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत अभ्यास करून त्यामध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे. याबाबत अभ्यास करून त्या अनुषंगाने शासनाला शिफारस करण्यासाठी अभ्यास गटाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर सभागृह क्र. २ पहिला मजला येथे बैठक घेण्यात आली. या अभ्यासगट बैठकीत जिल्हा परिषद गडचिरोलीचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून जिल्ह्यात शिक्षकांच्या बदली संदर्भात येणाऱ्या समस्या मांडल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती मनोहर पोरेटी, जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-27


Related Photos