नागपूरमध्ये आढळला कोरोना व्हायरसचा संशयित रूग्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
चीन सह अनेक देशात खळबळ माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा एक संशयित रुग्ण नागपुरातही समोर आला आहे. नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात या संशयित रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल ३५ वर्षीय व्यक्ती हा व्यावसायिक असून तो चीन मध्ये व्यापारासाठी जाणे येणे करतो.
२७ डिसेंबरला हा तरुण व्यावसायासाठी चीनला गेला होता. तेथून तो ६ जानेवारीला भारतात परत आला. २७ जानेवारीपासून या व्यक्तीला सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने शंकेपोटी त्याने मेडिकल प्रशासनाला याची माहिती दिली. ज्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी करून रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. भलेही तपासणी दरम्यान कोरोनाचे लक्षण दिसून आली नाहीत तरी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णास मेडिकलमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली की नाही हे प्रयोगशाळेतून रक्ताचा अहवाल प्राप्त झाल्यावरच स्पष्ट होईल. दरम्यान नागपूरात कोरोना संशयित रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय मेडिकल व मेयो रुग्णालये सज्ज झाली असून या रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.
  Print


News - Nagpur | Posted : 2020-01-31


Related Photos