गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील जिप शाळांना निधी मिळणार


- जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याला यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांना निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळांच्या निधीकरिता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सातत्याने शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. या निधीला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व अविकसित म्हणून ओळखला जात असून या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची पुरेशा निधीअभावी दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शाळांच्या दुरुस्तीची आवश्यकता असताना सुद्धा निधीअभावी ते करता येत नव्हते. शिवाय संरक्षण भिंत व वर्गखोलींचे बांधकाम करणे गरजेचे असतानाही निधीअभावी ते शक्य नसल्याने शाळांमधील विद्यार्थी असुरक्षितरित्या ज्ञानार्जन करीत होते. ही बाब जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे प्रस्ताव सादर करुन याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ही बाब गांभिर्याने घेत शासनाकडे व वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करुन गडचिरोली जिल्हृयातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांकरिता निधी मंजूर केला आहे. या निधी अंतर्गत आता जिल्हयातील जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शिवाय आवश्यक त्या ठिकाणी वर्गखोल्यांचे बांधकाम व संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच शाळांमध्ये आवश्यक सोयी -सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या शिक्षणाचे धडे गिरविता येणार आहेत. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्यामुळे नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांना निधी मंजूर झाल्याने या निर्णयाचे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. तसेच याबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह शासन व जिल्हाधिकाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-09


Related Photos