महत्वाच्या बातम्या

 नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाची कारवाई : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात वाघांच्‍या हल्‍ल्‍यात सातत्‍याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे, अन्‍यथा निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

१४ डिसेंबर रोजी मुल तालुक्‍यातील कांतापेठ येथे देवराव सोपनकार, सावली तालुक्‍यात बाबुराव कांबळे व १५ डिसेंबर रोजी खेडी येथे स्‍वरूपा येलट्टीवार यांचा वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍यु झाला. त्‍याआधी ७ डिसेंबर रोजी पेटगांव येथे देखील वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यु झाला. सतत होणारे वाघांचे हल्‍ले व नागरिकांचे जाणारे बळी ही चिंतेची बाब आहे. या वाघांना तातडीने जेरबंद करण्‍याचे आवश्‍यकता आहे. याबाबत कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. याबाबत त्‍यांनी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्‍या कार्यवाहीचे निर्देश दिले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos