शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण


- कमी भावात व्यापाऱ्यांना द्यावे लागतेय धान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
हलक्या आणि मध्यम प्रतीच्या धानाला सध्या अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागत असतानाच काही शेतकऱ्यांनी मळणी केलेल्या धानाची विक्री कुठे करावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांना  कमी भावाने बाजारपेठेत व्यापाऱ्यांना धान विक्री करावी लागली. यामुळे धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील इतरही भागातील शेतकऱ्यांच्या  हलक्या प्रतीच्या धानाची मळणी झालेली आहे. हे धान शेतकरी जिल्हा मार्केटींग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करतात. शासकीय हमीभावानुसार धानाची खरेदी तसेच बोनससुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. मात्र यावर्षी अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात धानाची विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपयांचे नुकसान सहन करावी लागत आहे. तातडीने शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-01


Related Photos