महत्वाच्या बातम्या

 संत निरंकारी मंडळाचे रक्दान शिबीरात १८८ यूनिट रक्तदान 


- रक्तदाना सारखे ईश्वरीय कार्य निरंकारी मंडळाची ओळख झाली आहे : आमदार कृष्णा गजबे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : संत निरंकारी मंडळ शाखा वाडसा (देसाईगंज) च्या वतीने आज संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज (वडसा) येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले. यात १६४ पुरुष व २४ महिला असे एकूण १८८ लोकांनी स्वयं स्फूर्तीने रक्तदान केले.

रक्तदान शिबीराचे उ‌द्घाटन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते किशन नागदेवे, झोनल इंचार्ज, संत निरंकारी मडळ वारसा/नागपूर झोन यांचे अध्यक्षते खाली आसाराम निराकरी, संयोजक, हरिष निरंकारी, क्षेत्रीय संचालक, सेवादल, नरेश वितलानी, अध्यक्ष, साईबाबा मंदिर, डॉ. अशोक तुमरेडी, रक्तपेवी, गडचिरोली, सतीश ताडकलवार यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. रक्तदाना सारखे ईश्वरीय कार्य संत निरंकारी मंडळाची ओळख झाली आहे असे भाव आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले.

रक्तपेढी जिल्हा रूग्णालय, गडचिरोली यांनी रक्त टंचाई झाल्यामुळे मंडळाला रक्तदान शिबीरासाठी विनंती करताच मंडळाद्वारे मानवसेवेसाठी तातडीने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे किशन नागदेवे यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात सांगितले.

संत निराकरी मंडळाद्वारे २४ एप्रिल सदगुरू बाबा गुरबचन सिंहजी महाराज तथा अन्य हुताम्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मानव एकता दिवस साजरा करण्यात येतो व त्याच दिवशी सर्व जिल्हा केंद्र किंवा इतर मुख्य ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदान करून श्रद्धांजली दिली जाते. व त्यांनतर सर्व विश्वभरात आवश्यकता व सोईनुसार रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.

रक्त संकलनासाठी रक्तपेढी, सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील चमुंनी परिक्षम घेतले. स्थानीय ग्रामीण रुग्णालय, वडसा चे रक्त तपासनी चमुनी सर्व रक्त दात्यांची तपासणी केली.

रक्तदान शिबीराला यशस्वी करण्यासाठी सेवादलचे सर्व स्त्री-पुरुष सदस्यांनी गणवेशात परिश्रम घेतले. कार्यकमाचे संचालन नानकराम कुकरेजा, संचालक सेवादल यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम डेंगानी यांनी केले.

रक्तदानासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. शिबीराला यशस्वी करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल किशन नागदेवे, झोनल इंचार्ज यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos