महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी उदयाला मतदान


- 24 उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात

- मतदान पथके मतदानस्थळी रवाना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : 08 वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघासाठी 16 लाख 82 हजार 771 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामध्ये 8 लाख 58 हजार 439 पुरूष तर 8 लाख 24 हजार 318 महिलांचा समावेश असून 14 तृतीयपंथींचा समावेश आहे. दिव्यांग मतदार 11 हजार 786 असून 80 वर्षावरील मतदारांची संख्या 25 हजार 22 आहे. तर 1 हजार 989 मतदान केंद्र तसेच 8 सहायकारी मतदान केंद्र असे एकूण 1 हजार 997 मतदान केंद्र असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून वर्धा लोकसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व  सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जबाबदारी अधिकारी, कर्मचारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.

लोकशाहीच्या महोत्सवामध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था -

मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, प्रतीक्षा शेड, वैद्यकीय किट, केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने प्रवेश सुविधा, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि साइन बोर्ड असतील. तसेच मतदान केंद्रावर स्वयंसेवक सहाय्य देखील उपलब्ध असणार आहे.

24 उमेदवार निवडणूक रिंगणात -

वर्धा लोकसभा मतदार संघात 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. 16 मार्च रोजी जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली होती. 28 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. 4 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्यात आले. 5 एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. तर 8 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्यात आले.

10 महिला मतदान केंद्र -

धामणगाव विधानसभा मतदार संघातील चांदूर रेल्वे येथील मतदान केंद्र क्र. 85 जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, उत्तर दिशा खोली क्र. 11, मोर्शी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 111 शिवाजी उच्च माध्यमिक शाळा, पश्चिमेकडील इमारत खोली क्र. 7, आर्वी विधानसभा मतदार संघातील मतदान कारंजा येथील केंद्र क्र. 92 कस्तुरबा विद्यालय, दक्षिण दिशा खोली क्र. 2 आणि आर्वी येथील मतदान केंद्र क्र. 161, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र. 4, देवळी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 181 व 182 नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालय, देवळी खोली क्र. 1 व 2, हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 254 भैयाजी सालवे प्राथमिक स्कूल व मतदान केंद्र क्र. 263 सेंट जॉन्स हायस्कूल, हिंगणघाट, वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 253 शासकीय विद्यालय, वर्धा खोली क्र.1 आणि भिमनगर, सावंगी येथील मतदान केंद्र क्र.3 09 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र. 4 या केंद्रांचा समावेश आहे.

इको फ्रेंडली मतदान केंद्र -

धामणगाव विधानसभा मतदार संघातील चांदूर रेल्वे येथील मतदान केंद्र क्र. 175-पळसखेड जि.प.प्राथमिक मराठी शाळा उत्तर दक्षिण इमारत रुम क्र.4, आर्वी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 241 जि.प.उच्च प्राथमिक शाळा, मेटहिरजी व मतदान केंद्र क्र. 230 जि.प.उच्च प्राथमिक शाळा, देहगाव (मु.), देवळी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 299 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोहणी व मतदान केंद्र क्र. 265 जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा खोली क्र. 1 विजयगोपाल, हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 87 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समुद्रपूर पूर्व भाग खोली क्र. 1 व मतदान केंद्र क्र. 214 आर.एस. बिडकर कॉलेज रुम नं. 3 (कला व वाणिज्य), वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 212 न्यू इंग्लीश ज्यू. कॉलेज, वर्धा खोली क्र. 25 आणि मतदान केंद्र क्र. 325  ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव (मेघे) या मतदान केंद्रांचा समावेश आहे.





  Print






News - Wardha




Related Photos