गडीसुर्ला शेतशिवारात ३ हजार मीटर विद्युत तारांची चोरी : महावितरणचे ६० हजारांचे नुकसानविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल तालुक्यातील गडीसुर्ला शेतशिवारात ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या पोलवरील सुमारे ३ हजार मीटर विद्युत तारांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली असून, यामुळे महावितरणचे अंदाजे ६० हजार २७० रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी गडीसुर्ला येथील नामदेव वेलुजी ढोले यांच्या शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल तालुक्यातील गडीसुर्ला शेतशिवारात ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या पोलवरील सुमारे ३ हजार मीटर विद्युत तारांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली असून, यामुळे महावितरणचे अंदाजे ६० हजार २७० रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी गडीसुर्ला येथील नामदेव वेलुजी ढोले यांच्या शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला मिळाली. त्यानंतर महावितरणचे तंत्रज्ञ भोजराज शेंडे हे बिघाडाची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी गेले. यावेळी छत्तीस पुल्लीवार यांच्या शेताजवळील ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या पोलवरील सुमारे ३ हजार मीटर तार चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या विद्युत तारांची किंमत अंदाजे ६० हजार २७० रुपये आहे. ही चोरी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी झाल्याचा अंदाज आहे. विद्युत वाहिनीवरील मोठ्या प्रमाणातील तार चोरीला गेल्याने महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याप्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता अभिषेक विलास देशपांडे यांनी मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.




Petrol Price




