महत्वाच्या बातम्या

 लग्नसराईने एसटी बसमध्ये तोबा गर्दी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधि / खांबाडा : सद्यः स्थितीत उन्हाचा पारा चांगला वाढला आहे. तालुक्याचे तापमान ४५ अंशांच्या पुढे पोहोचले आहे. तसेच उन्हाळा असल्याने लग्नप्रसंगी प्रवाशांची गर्दी बसस्थानकात वाढली आहे. परिणामी शहरासह  ग्रामिणभागातील बसस्थानकातून एसटी बस हाऊसफुल्ल प्रवाशांनी धावत आहे.

एप्रिल महिन्यास प्रारंभ झाला आहे. या महिन्यात लग्नसराईचा चांगलाच ठोक आहे. नंतर महिनाभर तरी लग्राची तिथी नसल्याने अनेकांतून सांगण्यात येत आहे. अशातच उष्ण तेचा पाराही चांगलाच वाढला आहे.

अशातच लग्नसराईमुळे एसटीमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. येथून जाणाऱ्या प्रत्येक बसमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी दिसून येत तसेच खासगी वाहनांनेही गाव  जवल करण्याचा प्रयत्न प्रवासी करताना दिसून येत आहे. मागील दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. सद्यःस्थितीत लग्नसराई सुटांचा काळ आहे. यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली एसटीच्या प्रवासात अमृत नागरिकयोजनेंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने प्रवास योजना सुरू केला आहे. महिलांना सरसकट ५० टक्के सवलत लागू केली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत आधीच वाढ झाली होती. त्यात आता लग्नसराई सुरू असल्याने उन्हाळ्यांच्या दिवसांत एसटीच्या प्रवासी संख्येत अधिकच वाढ झाली आहे. एसटीच्या प्रवासाला सवलतधारक प्रवाशांकडून प्राधान्य दिले जात आहे. अशातच काहींची खासगी वाहनांकडे धाव दिसून येत आहे. पूर्वीच्याच भंगार गाड्यांतून प्रवाशांची वाहतूक महामंडळाकडून केली जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos