महत्वाच्या बातम्या

 शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी ३० एप्रिल ची मुदतवाढ 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगर व्यावसायीक, अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांनी सन २०२२-२३, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशित अनु.जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर विद्यार्थ्यांची नवीन अर्ज नोंदणी व भरलेले शिष्यवृत्तीचे अर्ज तसेच महाविद्यालयीन स्तरावर अद्यापही भरपुर प्रमाणात प्रलंबित असलेले अर्ज अद्याप पर्यंत मंजूरी करीता सादर केलेले नाहीत, त्यांना अर्ज पाठविण्याची मुदत ३० एप्रिल २०२४ ही आहे. महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी पात्र अर्ज परिपुर्णरित्या तपासणी करुन विहीत वेळेत अर्ज मंजूरीच्या प्रक्रियेसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयाकडे सादर करण्यात यावे. 

सदर अर्ज विहित वेळेत निकाली ना काढल्यास तसे अर्ज प्रणालीतुन कायमस्वरुपी रददबातल (Auto Reject ) होतील याची सर्वांनी दखल घ्यावी. महाडिबीटी ऑनलाईन पोर्टलवरील भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची नविन अर्ज नोंदणी करण्यासाठी ३० एप्रिल २०२४ ही शेवटची संधी असल्याची सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos