आ. डाॅ. देवराव होळी यांच्या विरोधातील १४ उमेदवारांचे डिपाॅझीट जप्त


- भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांपैकी सर्वाधिक मताधिक्याने डाॅ. होळी विजयी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
काल २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहिर झाला. यामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ.डाॅ. देवराव होळी हे ९७ हजार ९१३ मते घेउन विजयी झाले आहेत. डाॅ. होळी यांनी प्रतिस्पर्धी काॅंग्रेसच्या उमेदवार ३५ हजार ३४१ मतांनी पराभव केला आहे. काॅंग्रेसच्या उमेदवार डाॅ. चंदा कोडवते यांना ६२ हजार ५७२ मते मिळाली आहेत तर उर्वरीत १४ उमेदवारांचे डाॅ. होळी यांनी डिपाॅझीट जप्त केले आहे. विशेष म्हणजे विदर्भातील भंडारा, गोेंदिया, चंद्रपूर, अकोला, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांपैकी डाॅ. देवराव होळी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर सर्वाधिक मतांच्या फरकाने मात केली आहे. 
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. यापैकी खरी लढत भाजप आणि काॅंग्रेसमध्येच झाली. मतमोजणीत सुरूवातीपासूनच डाॅ. होळी आघाडीवर राहिले. या निवडणूकीत डाॅ. होळी यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांपैकी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपाल मगरे यांना ६  हजार ७३५ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अक्षमलाल सिडाम यांना ३ हजार ९९९ मते मिळाली आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्री वेळदा यांना ३  हजार ८७० मते मिळाले. संभाजी ब्रिगेड पक्षाचे उमेदवार यांनी ३ हजार २५६ मते पटकाविली आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या ममिता तुळशिराम हिचामी यांना २  हजार ९०३ , आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडीयाचे सतिश कुसराम यांना १ हजार ४२८, अपक्ष केसरी कुमरे यांना ५३६ , अपक्ष गुलाबराव मडावी यांना ६८४, अपक्ष चांगदास मसराम यांना ७९१, अपक्ष दिवाकर पेंदाम यांना ९११ , अपक्ष शिवाजी नरोटे यांना १ हजार ३०० , अपक्ष सागर कुंभरे यांना ३  हजार १७९ , अपक्ष संतोष मडावी यांना ७७४, अपक्ष संतोष दशरथ सोयाम यांना ३ हजार १७४ मते मिळाली आहेत. तर २ हजार २७३ मतदारांनी यापैकी कुणीही नाही हा पर्याय निवडला आहे.  काॅंग्रेसच्या उमेदवार डाॅ. चंदा कोडवते वगळता गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील उर्वरीत १४ उमेदवारांचे डिपाॅझीट जप्त झाले आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-25


Related Photos